इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Tuesday 15 July 2014

ईमेलच्या खाली सही करा.

ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार. तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते.

ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार. तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते.

Online Wisestamp Click



मराठी टायपिंग मोबाईल






Android मोबाइल वर मराठी-हिन्दी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल हिंदी इनपूट नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं......
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही shahal अस लिहिलं तर तुम्हाला शहाळ असं दिसेल अथवा टाइप होईल
वापरुन पहा ..... नक्की आवडेल
मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा गूगल हिंदी अॅप्स





मराठी टायपिंग कॉम्पुटर

 मराठीतून टायपिंग करायचंय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठीतून टायपिंग. थोड्या       वर्षांपूर्वी मराठीतून टायपिंग कराण्यासाठी सर्व अक्षरं पाठ करून त्यासाठी इंग्लिश बटणे लक्षात ठेवावी लागत.मात्र आता खाली दिलेल्या पर्यायांना वापरुन तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करता येते. ही सर्व सोंफ्टवेअर यूनिकोड प्रकारची आहेत.



                              


            यामुळे तुम्ही मराठी शब्दाचे इंग्लिश स्पेलिंग लिहून मराठी शब्द  टाइप करता येऊ शकते.

उदा.    Marathi     -     मराठी
           Microsoft  -    मायक्रोसॉफ्ट
           Blog          -     ब्लॉग

  गूगल                      1. http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

 मायक्रोसॉफ्ट          2. http://www.bhashaindia.com/ilit/

 Quillipad               3.  http://quillpad.in/marathi/ 


 बरहा                      4.  www.baraha.com


source:-http://www.marathitech.in/2012/09/marathi-typing.html

Monday 14 July 2014

गुगलमध्ये माहिती शोधताना

गुगल.कॉमवर आपण बर्‍याचवेळा निरनिराळ्याप्रकारची माहिती शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी गुगल.कॉमवर अनेक (हजारो) वेबसाईटची यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठिण जाते आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय नसतो. मग विनाकारण खुप वेळ वाया जातो. अशावेळी गुगलचा कंटाळा येतो.
कधीकधी गुगल.कॉमचा हाच स्वभाव अनेकांना आवडत नाही. विचारलेल्या माहितीची असंख्य पाने दाखविल्यावर त्यांना राग येतो. यावेळी गुगल.कॉमला नावे ठेवण्यापेक्षा आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल.कॉमला मदत होते आणि परीणामी आपला वेळही वाचतो.
गुगल.कॉमवर माहिती शोधताना कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो.



१. आपल्या प्रश्नामध्ये ' + '  चिन्हाचा वापर करावा :  समजा गुगल.कॉमवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (म्हणजेच मोबाईलचा इतिहास) शोधायचे असल्यास गुगल.कॉम ' Mobile + History ' असे सर्च केल्यास गुगल.कॉम हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.
२. आपल्या प्रश्नामध्ये ' - '  चिन्हाचा वापर करावा :  समजा जर आपणास गुगल.कॉमवर  'sachin'  असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये 'sachin tendukar' च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगल.कॉमला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर 'sachin -tendukar' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल.कॉम येणार्‍या उत्तरामध्ये 'tendukar'' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.
३. आपल्या प्रश्नामध्ये ' ~ '  चिन्हाचा वापर करावा :  गुगल.कॉमवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखिल गुगल.कॉम दाखवितो.
४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास :  सध्या बर्‍याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीह एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगल.कॉमवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल.कॉम फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो. उदा. ' site:www.abc.com mobile ' असे दिल्यास गुगल.कॉम फक्त www.abc.com  वर mobile  हा शब्द शोधेल.
५. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचे असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगल.कॉम त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास गुगल.कॉम त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ' define:Computer ' असे शोधल्यास गुगल.कॉम ' Computer ' या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.
६. मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्‍याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमूळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्या विषयीच्या आणि त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का? ते शोधण्यासाठी ' related: ' या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http://www.xyz.com/ ' असे शोधल्यास गुगल.कॉम ' www.xyz.com ' प्रमाणेच माहिती असणार्‍या वेबसाईटची यादी देईल.
७. जसाच्यातसा शब्ध शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगल.कॉमवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच " " याचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर "contact us"  असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एखत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.
८. आपल्या प्रश्नामध्ये ' * '  चिन्हाचा वापर करावा :  गुगल.कॉमवर एखादा शब्द शोधताना तो शब्द  पुर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधीत इतरही शब्द सापडल्यास ती देखिल दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ' * '  चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर ' friend* '  असे शोधल्यास friend  ह्या शब्दासोबत friends , friendship  या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचा देखिल उत्तरामध्ये विचार करतो.
९. आपल्या प्रश्नामध्ये ' ? '  चिन्हाचा वापर करावा :  एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? '  चिन्हाचा वापर करावा. उदा. ' fri??d '  असे सर्च केल्यास गुगल.कॉम त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्यती अक्षरे घेवून त्या माहितीची पाने दाखवितो.
१०. आपल्या प्रश्नामध्ये ' AND  अथवा OR '  शब्दाचा वापर करावा : एखाद्या वेळेस जर आपणास दोन शब्दाना मिळून एकत्रिच सर्च करायचे असते त्या वेळी ' AND  अथवा OR '  शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल.कॉम मध्ये सर्च करताना ' Mobile or Books ' सर्च केल्यास गुगल.कॉम ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ' AND '  शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.


source :- http://www.sahajach.com/mala_bharpoor_yete/google_search.html

प्रॉब्लेम्स शेअर करणारी वेबसाइट

'शेअरिंग दर्द डॉट कॉम' वेबसाइट सुरू
९० हजारांहून अधिक युजर्स 

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 

अभ्यासाचं टेन्शन असो वा मित्र-मैत्रिणींची भांडणं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, ब्रेकअप, बॉसची कटकट, कामाचा ताण अशा अनेक प्रॉब्लेम्सना आपण दररोज सामोरे जातो. मात्र, याबाबत आपण कोणाशीही बोलत नसल्याने मनाची घुसमट होते. त्यामुळे युवक व युवतींच्या अशा अनेक समस्यांवर सोल्युशन म्हणून चार तरुणांनी 'शेअरिंग दर्द डॉट कॉम' ही वेबसाइट तयार केली आहे. तिच्या माध्यमातून सध्या ९० हजारांहून अधिकजण आपले प्रॉब्लेम्स शेअर करत आहेत. त्यांना जॉब व लव्ह अँड रिलेशनशिप दर्दचे प्रॉब्लेम आहेत. 




या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकता. तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी इथले मित्र तुम्हाला मदत करतात आणि तेही मोफत. कारण तेही तुमच्यासारखेच समदु:खी असतात. विशेष म्हणजे इथे तुमची ओळख गुप्त ठेवली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही मोफत मिळते. अर्थात सल्ला मोफत मिळतो, मानसोपचार हवे असल्यास मात्र डॉक्टरांची फी द्यावी लागते. आयआयएम लखनौमधून शिक्षण घेतलेल्या रितिका शर्मा, सुमंत गजभिये, गौरव राजन आणि लिमा जेम्स या चार मित्रांनी या वेबसाइटची निर्मिती केली आहे. सध्या हे चौघेही मुंबईतच असतात. दोन वर्षांच्या प्रयत्नातून त्यांनी ही वेबसाइट आठ महिन्यांपूर्वी तयार केली आहे. 

या वेबसाइटवर १६ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम समुपदेशनाचे काम करते. मुंबईमधील तरुणांना आय एम फिलिंग लोनली दर्द हा प्रॉब्लेम अधिक आहे, तर कोल्हापुरातील तरुणांना जॉब व लव अँड रिलेशनशिप दर्द आहे. या वेबसाइटवर सहा प्रकारची विभागणी केली असून जॉब अँड करिअर दर्द, आय एम फिलिंग लोनली दर्द, लव अँड रिलेशनशिप दर्द, सोशल अँड फॅमिली दर्द, मेट्रोमोनी सर्च दर्द, सोशल तेबू दर्द असे आहेत. 

एकटेपणा, डिप्रेशन, घुसमट हे सारे बोलण्यासाठी हक्काची जागा हवी असे त्यांना वाटायचे. त्यातूनच तयार केली एक वेबसाइट 'शेअरिंग दर्द डॉट कॉम'. यामुळे अनेकांना आपले मन मोकळे तर करता येतेच, शिवाय टेन्शन फ्री जीवन जगण्याची नवीन दिशा मिळत आहे. - सुमंत गजभिये, वेबसाइट डेव्हलपर 





source :- http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/computer/sharingdard-to-share-some-problem/articleshow/28678112.cms

कृषी निर्यात

देशातून मोठ्या प्रमाणात कृषीमालाची निर्यात केली जाते. या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची अॅग्रीकल्चर अँड प्रोसेस्ड फूड प्रोडक्ड एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ही संस्था काम करते. याविषयी अधिक माहिती http://www.apeda.gov.in/ या वेबसाइटवर मिळू शकेल.


ऑनलाइन माध्यमांतून पैसे मिळवा

इंटरनेटच्या आगमनामुळे मानवी जीवनात प्रचंड मोठे बदल घडून आले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडून आलेल्या बदलामुळे जग एका 'क्लिक'वर येऊन ठेपले आहे. किरकोळ व्यापारापासून ते अगदी सोशल नेटवर्किंगपर्यंत सर्वच क्षेत्रात इंटरनेटची मक्तेदारी वाढली आहे. त्यामुळे स्थळ, वेळ आणि काळ यांच्या सीमारेषा पुसून टाकणाऱ्या या तंत्रज्ञानाचा उपयोग करून चार पैसे मिळविण्याकडेही अनेकांचा कल आहे.


नोकरी, व्यापार, उद्योग यातून मिळणाऱ्या ​आर्थिक लाभांव्यतिरिक्त थोड्याशा प्रयत्नांतून चार पैसे अधिक मिळणार असतील, तर अनेकांची तयारी असते. हल्ली अशा कामांसाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बहुतांश कंपन्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलाविण्याऐवजी 'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय अवलंबताना दिसतात. एखादे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित व्यक्तीने ऑफिसात दिवसभर राहण्याची अटही मागे पडत चालली आहे. संभाव्य अडचणींच्या निवारणासाठी कॉन्फरन्स आणि व्हिडिओ कॉलिंगसारख्या सु​विधाही उपलब्ध आहेत. 'वर्क फ्रॉम होम'सारख्या सुविधांमुळे खर्चात आणि वेळेत बचत होत आहे. याचा फायदा थेट कंपन्यांनाचा होत असल्याचेही दिसून आले आहे.

विदेशात आणि विकसित राष्ट्रांमध्ये श्रम आणि पैशाची बचत करण्यासाठी कामे बाहेर देण्याची अथवा 'आउटसोर्स' करण्याची प्रथा रूढ होत आहे. आपल्याकडेही घरबसल्या काम करण्याची पद्धती हळूहळू विकसित होत आहे. घरबसल्या काम मिळविणाऱ्यांमध्ये गृहिणी, एकट्या महिला आणि मुलींचे प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर 'ऑनलाइन' अथवा 'इंटरनेट'च्या माध्यमातून चार पैसे कमविण्याचा नवा मार्ग विकसित झाला आहे. आजच्या या लेखात आपण 'ऑनलाइन पैसे कमविण्याचे' मार्ग समजून घेणार आहोत. थोडीशी काळजी घेतली आणि कॉमन सेन्सचा वापर केला की, 'ऑनलाइन पैसे कमविण्याचा' राजमार्ग पटकन लक्षात येऊ शकतो.

फ्री-लान्सिंग : ज्यांना ऑनलाइन काम करून पैसे मिळवायचे असतील, त्यांनी फ्री-लान्सिंगचा पर्याय अवश्य निवडावा. सध्या इंटरनेटवर 'ओडेस्क डॉट कॉम' (odesk.com) आणि 'एलान्स डॉट कॉम'(elance.com) या भन्नाट साइट्स उपलब्ध आहेत. या साइट्सवर जगभरातील अनेक प्रोफेशनल व्यक्ती अथवा कंपन्या स्वतंत्रपणे प्रोजेक्ट उपलब्ध करून देतात. या वेबसाइटवर लिखाण, वेब डिझाइन, तंत्रज्ञान आदी विषयांमधील कामांचे वाटप करण्यात येते. या साइटवर रजिस्ट्रेशन करून कामाची आवड स्पष्ट केल्यास जगभरातील नामांकित संस्था आणि व्यक्तींबरोबर कामांची संधी मिळू शकते. संबंधितांबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येऊ शकते. या ऑनलाइन कामांमुळे आ​​​र्थिक लाभांव्यतिरिक्त घरबसल्या कामाची संधी, ओळखीपाळखी, आणि स्वतःच्या नव्या व्यवसायाचा प्रारंभ करता येणे शक्य होते. या कामांतून वाढविलेल्या ओळखींचा उपयोग भविष्यात होऊ शकतो.

डोमेनची खरेदी अथवा विक्री : इंटरनेटवर उपयुक्त असणाऱ्या 'डोमेन नेम'ची खरेदी अथवा विक्री हा ऑनलाइन वर्कमधील सर्वांत लोकप्रिय आणि आकर्षक असा प्रकार आहे. सध्या आकर्षक आणि चांगल्या प्रकारच्या 'डोमेन नेम'ची बाजारात लोकप्रियता वाढत आहे. विविधप्रकारच्या वेबसाइटची मागणी आणि लोकप्रियता वाढत असल्याने 'डोमेन नेम' खरेदी विक्रीचा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरत आहे. चांगल्या प्रकारची आणि क्रिएटिव्ह 'डोमेन नेम'ची बँक जवळ असणे आणि वेळप्रसंगी ती चांगल्या किमतीला विकणे, हे या उद्योगाचे प्राथमिक स्वरूप आहे. 'डोमेन नेम'ची किंमत त्याच्या आकर्षक नावांवर अवलंबून असते, त्यामुळे या उद्योगाच्या वाढीला निश्चितच अधिक संधी आहेत.

डे ट्रेडिंग : ऑनलाइन उत्पन्नाच अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच धोकादायक पर्याय म्हणून 'डे ट्रेडिंग'कडे पाहिले जाते. 'डे ट्रेडिंग' ही प्रामुख्याने शेअर बाजाराशी संबंधित संकल्पना आहे. आपण शेअर बाजारातील उत्तम जाणकार आहात आणि आकड्यांची गणिते समजून घेण्याची आपली हातोटी असेल, तर आपल्यासाठी 'डे ट्रेडिंग' पैसे कमविण्यासाठी उत्तम पर्याय आहे. उत्तमोत्तम कंपन्या आणि शेअर्सचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतरच हा पर्याय निवडणे, अधिक श्रेयस्कर ठरेल. कमी किमतीत कंपन्यांचे शेअर खरेदी करणे आणि चांगला भाव आल्यानंतर विकणे, ही 'डे ट्रेडिंग'मध्ये यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे. हे शेअर खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाइनच होत असतात. त्यातही महत्वाचे म्हणजे एकाच दिवसांत शेअर खरेदी करून विकावा लागतो. त्यामुळे अगदी कमी कालावधीत पैसे कमविण्याची संधी असणारा हा पर्याय अत्यंत धोकादायक असल्याने त्यापासून दूरच राहाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर नामवंत कंपन्यांचे शेअर कमीतकमी भावात खरेदी करणे, दिवसांतर्गत सत्रांमध्ये भाव वाढण्याची प्रतीक्षा करणे आणि भाव वाढला की त्वरित विक्री करणे ही 'डे ट्रेडिंग'ची त्रिसूत्री होय. मात्र, बऱ्याच वेळा शेअरचा भाव पडून गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याचीच भीती अधिक असते. त्यामुळे पुरेसा अभ्यास असल्याव्यतिरिक्त 'डे ट्रेडिंग'च्या भानगडीत पडू नये हेच उत्तम.

'ई-ट्युटोरियल्स' : एखाद्या विषयात तुमचा हातखंडा असेल आणि तो विषय शिकविण्याची हातोटी अथवा काही वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी असेल, तर 'ई-ट्युटोरियल' हा घरबसल्या आणि ऑनलाइन पैसे मिळविण्याचा चांगला पर्याय ठरू शकतो. 'ई-ट्युटोरियल'मधील अजिबातच अनुभव नसेल, तर 2tion.netor, tutorvista.com आदी वेबसाइटना भेट देऊ शकता. या वेबसाइटशी संपर्क झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीचे विषय आणि अनुभवाविषयी विचारणा केली जाते. तुमचा अनुभव, पात्रता लक्षात घेऊन तुमची वेळ आणि मानधन निश्चित केले जाते. त्यानंतर तुमच्या माहितीची पडताळणी करून 'ई-ट्युटोरियल' साइट्सद्वारा शिक​वणी लावण्यासाठी इच्छुक विद्यार्थी आणि तुमची भेट घडवून आणली जाते. त्यानंतर ऑनलाइन अथवा व्हर्च्युअल ट्युशनला सुरुवात होते. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांशी संपर्कात राहू शकता. एकदा का तुमच्या ऑनलाइन शिकवणी वर्गाला सुरुवात झाली, की तुमच्या क्षमता आणि शिकविण्याची पद्धत यानुसार तुम्हाला मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्यात येते. या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी, घरबसल्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकता.

डिझाइन अथवा चित्रांची विक्री : तुम्ही चांगले चित्रकार अथवा डिझायनर असाल, तर ऑनलाइन माध्यमातून चांगली कमाई होण्याची शक्यता अधिक आहे. तुम्ही तुमच्या डिझाइन अथवा चित्राची ऑनलाइन विक्री करून चांगले उत्पन्न कमवू शकता. तुम्ही तुमची चित्रे, डिझाइन अपलोड करू शकता. ती पाहून संबंधित ग्राहक त्यांची मागणी नोंदवू शकतो. या शिवाय अनेक लघुउद्योजक टी-शर्ट, टोप्या, पुस्तके, पोस्टर, कँलेंडर, ग्रीटिंग कार्ड आदी वस्तूंची विक्री सहज शक्य असल्याचे सांगतात. स्वतःची वेबसाइट नसेल, तर तुम्ही www.lulu.com, www.zazzle.com या वेबसाइटच्या माध्यमातून तुमच्या उत्पादनांची विक्री करू शकता. तुमच्या प्रत्येक उत्पादनाच्या विक्रीवर कमिशनपोटी रक्कम तुम्हाला मिळेल.

ऑनलाइन खरेदी-विक्री करा : पूर्वीच्या काळी एखाद्या वस्तूची विक्री करायची असेल, तर सर्वप्रथम बाजारात जाऊन खरेदीदाराचा शोध घ्यावा लागत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. एका क्लिकवर आता नकोशा वस्तूंची विक्री करता येणे सहज शक्य झाले आहे. OLX.com आणि Quikr.com सारख्या वेबसाइटच्या माध्यमातून वस्तूचा फोटो काढून तो अपलोड करणे, एवढेच काम उरले आहे. या माध्यमातून संभाव्य ग्राहक तुमची जाहिरात पाहून थेट तुमच्याशी संपर्क साधतो. विशेष म्हणजे कोणत्याही मध्यस्थ अथवा दलाला​शिवाय वस्तूची खरेदी अथवा विक्री करता येते.

ऑनलाइन फोटो विका : तुम्ही जर चांगले फोटोग्राफर असाल, तर तुम्हाला ऑनलाइन पैसे कमविण्याची चांगली संधी आहे. चांगल्या प्रतीच्या आणि दर्जाच्या फोटोंना सध्या बाजारात चांगली मागणी आहे. www.shutterstock.com, www.shutterpoint.com आणि www.istockphoto.com यांसारख्या वेबसाइटना चांगल्या फोटोंची कायम आवश्यकता भासते. तुमचे फोटो या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात येतात. त्यानंतर चांगली किंमत आल्यानंतर त्यांची विक्री करण्यात येते. फोटोची विक्री झाल्यानंतर तुम्हाला रॉयल्टीपोटी १५ ते ८५ टक्के रक्कम देण्यात येते.

स्वतःची पुस्तके प्रकाशित करा : 'ई-बुक्स'च्या माध्यमातून वाचनाची हौस भागविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा वाचनवेड्यांसाठी 'अॅमेझॉन'ने 'किंडल डायरेक्ट पब्लिशिंग' हा अनोखा पर्याय सादर केला आहे. कुणीही आपली स्वलिखित पुस्तके येथे अपलोड करून चांगले पैसे मिळवू शकतो. पुस्तकांची जसजशी विक्री होईल, त्याप्रमाणे रॉयल्टी लेखकास दिली जाते. सध्या ही सेवा काही मोजक्याच देशांत उपलब्ध आहे.


source:- http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/computer/online-internet/articleshow/33463816.cms

असा मिळवा ‘आर्कुट’वरील डाटा

ऑर्कुट बंद होणार ही बातमी गेल्या आठवड्यात सर्वांपर्यंत पोहोचली. त्यानंतर अनेकांनी पुन्हा एकदा ऑर्कुटला भेट देऊन जुने दिवस आठवले. पण तुमचे जुने सगळे फोटो, पोस्ट पुन्हा मिळणार नाहीत अशी भीती बाळगू नका. त्यावरील डाटा ट्रान्सफर झालेला नाही. हा डाटा तुम्हांला हवा असेल तर तो सहजपणे मिळू शकतो. गुगलने तुम्हांला ती संधी दिली आहे. मात्र, दुसऱ्याला पाठविलेले स्क्रॅप्स किंवा टेस्टिमोनियल्स तुम्हांला डाउनलोड करता येणार नाही. परंतु, तुम्ही दुसऱ्या युजर्सने पाठविलेला डाटा, स्क्रॅप्स किंवा टेस्टिमोनीयल डाउनलोड करता येणे शक्य आहे.


ट्विटर, फेसबुक यांच्यापूर्वी आर्कुट हे एकमेव सोशल मीडियाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, फेसबुकची इतर सोशल मीडियाची लोकप्रियता वाढल्यानंतर आर्कुटचे महत्त्व कमी कमी झाले. परंतु, अजूनही अनेक यूजर्सचे आर्कुटवर अकाउंट आहेत. आर्कुटवरील पिक्चर्स तुम्ही सहजपणे सेव्ह करू शकता. यासाठी आर्कुटवरील तुमचा डाटा गुगल प्लसवर ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा तुम्हांला २० सप्टेंबर २०१४ पर्यंत उपलब्ध आहे. डाटा ट्रान्सफर करण्यासाठी पुढील टिप्सचा अवलंब करू शकता.

सर्वप्रथम गुगल प्लसवर जाऊन तुमचे अकाउंट ओपन करा. यानंतर आर्कुट अल्बम एक्स्पोर्ट पेज ओपन करा. तुम्हांला जो अल्बम किंवा डाटा हवा असेल त्यावर क्लिक करा. सर्वच डाटा हवा असेल तर त्यावर क्लिक करा. यानंतर इम्पोर्ट सिलेक्ट केल्यास तुमचा सर्व डाटा, फोटोज गुगल प्लसवर ट्रान्सफर होईल. गुगल प्लसवर हे फोटो फक्त तुम्हाला दिसतील. इतरांनाही हे फोटो पाहता यावेत यासाठी प्रायव्हसी सेटिंगमध्ये बदल करणे गरजेचे आहे. तुम्हांला हे पिक्चर्स व स्क्रॅप्स सेव्ह करायचे आहेत तर गुगल टेकआऊटचा वापर करू शकता. या गुगल टेकआऊटव्दारे तुम्हांला सर्व डाटा झिप फाइलमध्ये डाउनलोड करता येईल. फाइल आणि फोटो HTML फाइल स्वरूपात तयार होतील.

आर्कुटवरील तुमचे प्रोफाइल, रिसिव्ह स्क्रॅप्स, टेस्टिमोनीयल्स, फोटोज तुम्ही डाउनलाड करू शकता. यासाठी गुगल टेकआउटचा वापर करू शकता. याव्दारे सप्टेंबर २०१६ पर्यंत आर्कुटवरचा डाटा तुम्ही डाउनलोड करू शकता. यासाठी गुगल टेकआउटवर साइन करून choose service वर क्लिक करा. यानंतर आर्कुटला सिलेक्ट करा आणि क्रिएट अर्काइव्हवर क्लिक करा. अर्काइव्ह रेडी होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही पेजवरून बाहेर पडू शकता. अर्काइव्ह रेडी झाल्याचा तुम्हांला ई-मेल येईल. एकदा अर्काइव्ह रेडी झाले तर डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही डाटा मिळवू शकता. मात्र, यासाठी गुगलने मर्यादा ठरवली आहे.

डोमेन नेम निवडताना..

१९९0 च्या दशकात एखाद्याच्या खिशात सोनेरी टोपणाचे चायना पेन दिसले, की लोक त्या व्यक्तीकडे अगदी कौतुकाने पाहत. विशेषत: पेनचा वापर करणारी व्यक्तीही आपल्या मित्रांत अगदी अभिमानाने सांगे की, 'मेड इन चायना' आहे. त्यानंतर मग १९९५ मध्ये मोबाईल आले, १८ रुपये आऊटगोइंग आणि १६ रुपये इनकमिंगचा कम्पास बॉक्स एवढा हँडसेट खिशात बाळगताना तर ती व्यक्ती हँडसेट आणि मोबाईल सेवा कंपनी दोघांचीही माऊथ पब्लिसिटी करण्यात धन्यता माने. जागतिकीकरणाने बघता बघता आपल्या जीनवशैलीत असा बेमालूम प्रवेश केला, की मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसाचं सारं कॅलेंडर जणू ब्रँडेड करून टाकले. नमनाला घडाभर तेल अशासाठी, की नावात काय आहे असे म्हणण्याचा जमाना आता मागे पडला आहे आणि नावातच सारे काही असे म्हणत ब्रँडिंग आता अपरिहार्य झाले आहे. ब्रँडिंग म्हणजे एखाद्या उत्पादनाला, कंपनीला त्या नावाने ओळखणे अशी ढोबळमानाने व्याख्या केली जाऊ शकेल. पण, आता ब्रँडिंगचा संकल्पनेचा विस्तार एखाद्या व्यक्तीचे ब्रँडिंग इथपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यात आता फेसबुक, ट्विटर, वेबसाइटच्या माध्यमातून ई-ब्रँडिंग या संकल्पनेने जोर धरला आहे. त्यामुळे ब्रँडिंगसोबतच ई-ब्रँडिंग हा आता परवलीचा शब्द झाला आहे. मात्र, ई-ब्रँडिंगची सुरुवात का, कशी, कधी करावी आणि काय सतर्कता बाळगावी, यासंदर्भात काही ठोकताळे तपासणे गरजेचे आहे. विषय जरी मोठा असला तरी, ई-मार्केटिंगच्या क्षेत्राची पहिली पायरी समजली जाणार्‍या वेबसाइट निर्मितीच्या अनुषंगाने काही टिप्स..

डोमेन नेम निवडताना..
स्पेलिंगमध्ये सुटसुटीतपणा हवा
एसएमएस, व्हॉट्सअँप किंवा चॅटिंगमुळे अनेक वेळा शब्दांचे शॉर्टफॉर्म वापरण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र, वेबसाइटचे नाव निवडल्यावर त्या नावाचे जे स्पेलिंग आहे, ते शास्त्रशुद्ध देणे फायद्याचे ठरते. जर शॉर्टकटच्या नावे स्पेलिंग केले तर कदाचित ते संबंधित लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही.
डोमेन नेम म्हणजे, वेबसाइटचे नाव. आजच्या घडीला डोमेन नेमचे पर्याय हे प्रामुख्याने डॉट कॉम, डॉट नेट, डॉट को.युके, डॉट को डॉट इन, डॉट इन असे उपलब्ध आहेत. मात्र, जगभरात डॉट कॉम च्या डोमेननेम अंतर्गतच सर्वाधिक वेबसाइट असल्याने आपल्याला ज्या नावाने वेबसाइट सुरू करायची आहे, त्यात डॉट कॉमचा पर्याय उपलब्ध आहे का, ते सर्वप्रथम तपासावे. ते नसल्यास अन्य पर्यायांचा विचार करता येईल. पण ते असेल तर वेबसाइटला लोकांपर्यंत पोहोचविणे अधिक सोपे डोमेन नेम निवडताना..

एकापेक्षा जास्त डोमेन नेम बुक करावी
कुणाचीही कॉपी नको
विचारांच्या पातळीवर हे काम अतिशय सोपे वाटते; पण त्यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे. कारण, हे नाव म्हणजे तुमच्या ब्रँडिंगची सुरुवात आहे आणि त्या ब्रँडच्या ओळखीवर भविष्यात तुमच्या उद्योगाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकापेक्षा जास्त डोमेन नेम बुक करावी

आपल्याला ज्या नावे डोमेन बुक करायचे आहे, त्याचे पर्याय निवडताना जर त्या सदृश आणखी एखाद-दोन पर्याय दिसले, तर तेही बुक करून ठेवणे भविष्यात फायद्याचे ठरते. एक म्हणजे, तुमची स्पर्धक कंपनी तुमच्या सदृश नाव विकत घेऊ शकणार नाही आणि दुसरा फायदा म्हणजे, तुम्हाला भविष्यात काही विस्तार करायचा असेल तर दुसरे डोमेन नेम उपयुक्त ठरू शकते. डोमेन नेम बुक करताना सखोल शोध घ्यावा. कारण समान व्यवसाय अथवा कॉमन वापरात असलेली काही डोमेन नेम ही लिलाव पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचाही पर्याय निवडता येईल. कुणाचीही कॉपी नको

आपल्या स्पर्धक कंपन्यांशी स्पर्धा करताना त्यांच्या नावाप्रमाणेच वेबसाइटचे नाव देण्याचा कल असतो. पण त्याऐवजी जर आपल्या कंपनीची स्वत:ची ओळख व ते नाव स्वत: एक सशक्त ब्रँड होईल, या दृष्टीने नावाची निवड करावी. स्पर्धक कंपनीच्या नावाशी स्पर्धा करण्याचा तोटाच अनेक वेळा होतो. एकतर त्या कंपनीचे जे रेप्युटेशन आहे, त्याच्याशी तुम्हीही अकारण जोडले जाता. व दुसरे म्हणजे, एखाद्याने सर्च दिलाच, तर सर्च देणारी व्यक्ती तुमच्या वेबसाइटऐवजी स्पर्धक कंपनीच्या वेबसाइटवर जाण्याची शक्यता असते.




source:- http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=122