इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Showing posts with label डोमेन नेम निवडताना... Show all posts
Showing posts with label डोमेन नेम निवडताना... Show all posts

Monday 14 July 2014

डोमेन नेम निवडताना..

१९९0 च्या दशकात एखाद्याच्या खिशात सोनेरी टोपणाचे चायना पेन दिसले, की लोक त्या व्यक्तीकडे अगदी कौतुकाने पाहत. विशेषत: पेनचा वापर करणारी व्यक्तीही आपल्या मित्रांत अगदी अभिमानाने सांगे की, 'मेड इन चायना' आहे. त्यानंतर मग १९९५ मध्ये मोबाईल आले, १८ रुपये आऊटगोइंग आणि १६ रुपये इनकमिंगचा कम्पास बॉक्स एवढा हँडसेट खिशात बाळगताना तर ती व्यक्ती हँडसेट आणि मोबाईल सेवा कंपनी दोघांचीही माऊथ पब्लिसिटी करण्यात धन्यता माने. जागतिकीकरणाने बघता बघता आपल्या जीनवशैलीत असा बेमालूम प्रवेश केला, की मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसाचं सारं कॅलेंडर जणू ब्रँडेड करून टाकले. नमनाला घडाभर तेल अशासाठी, की नावात काय आहे असे म्हणण्याचा जमाना आता मागे पडला आहे आणि नावातच सारे काही असे म्हणत ब्रँडिंग आता अपरिहार्य झाले आहे. ब्रँडिंग म्हणजे एखाद्या उत्पादनाला, कंपनीला त्या नावाने ओळखणे अशी ढोबळमानाने व्याख्या केली जाऊ शकेल. पण, आता ब्रँडिंगचा संकल्पनेचा विस्तार एखाद्या व्यक्तीचे ब्रँडिंग इथपर्यंत येऊन ठेपला आहे. त्यात आता फेसबुक, ट्विटर, वेबसाइटच्या माध्यमातून ई-ब्रँडिंग या संकल्पनेने जोर धरला आहे. त्यामुळे ब्रँडिंगसोबतच ई-ब्रँडिंग हा आता परवलीचा शब्द झाला आहे. मात्र, ई-ब्रँडिंगची सुरुवात का, कशी, कधी करावी आणि काय सतर्कता बाळगावी, यासंदर्भात काही ठोकताळे तपासणे गरजेचे आहे. विषय जरी मोठा असला तरी, ई-मार्केटिंगच्या क्षेत्राची पहिली पायरी समजली जाणार्‍या वेबसाइट निर्मितीच्या अनुषंगाने काही टिप्स..

डोमेन नेम निवडताना..
स्पेलिंगमध्ये सुटसुटीतपणा हवा
एसएमएस, व्हॉट्सअँप किंवा चॅटिंगमुळे अनेक वेळा शब्दांचे शॉर्टफॉर्म वापरण्याकडे लोकांचा कल असतो. मात्र, वेबसाइटचे नाव निवडल्यावर त्या नावाचे जे स्पेलिंग आहे, ते शास्त्रशुद्ध देणे फायद्याचे ठरते. जर शॉर्टकटच्या नावे स्पेलिंग केले तर कदाचित ते संबंधित लोकांपर्यंत नीट पोहोचत नाही.
डोमेन नेम म्हणजे, वेबसाइटचे नाव. आजच्या घडीला डोमेन नेमचे पर्याय हे प्रामुख्याने डॉट कॉम, डॉट नेट, डॉट को.युके, डॉट को डॉट इन, डॉट इन असे उपलब्ध आहेत. मात्र, जगभरात डॉट कॉम च्या डोमेननेम अंतर्गतच सर्वाधिक वेबसाइट असल्याने आपल्याला ज्या नावाने वेबसाइट सुरू करायची आहे, त्यात डॉट कॉमचा पर्याय उपलब्ध आहे का, ते सर्वप्रथम तपासावे. ते नसल्यास अन्य पर्यायांचा विचार करता येईल. पण ते असेल तर वेबसाइटला लोकांपर्यंत पोहोचविणे अधिक सोपे डोमेन नेम निवडताना..

एकापेक्षा जास्त डोमेन नेम बुक करावी
कुणाचीही कॉपी नको
विचारांच्या पातळीवर हे काम अतिशय सोपे वाटते; पण त्यावर सखोल विचार होणे गरजेचे आहे. कारण, हे नाव म्हणजे तुमच्या ब्रँडिंगची सुरुवात आहे आणि त्या ब्रँडच्या ओळखीवर भविष्यात तुमच्या उद्योगाचे भवितव्य अवलंबून असणार आहे. एकापेक्षा जास्त डोमेन नेम बुक करावी

आपल्याला ज्या नावे डोमेन बुक करायचे आहे, त्याचे पर्याय निवडताना जर त्या सदृश आणखी एखाद-दोन पर्याय दिसले, तर तेही बुक करून ठेवणे भविष्यात फायद्याचे ठरते. एक म्हणजे, तुमची स्पर्धक कंपनी तुमच्या सदृश नाव विकत घेऊ शकणार नाही आणि दुसरा फायदा म्हणजे, तुम्हाला भविष्यात काही विस्तार करायचा असेल तर दुसरे डोमेन नेम उपयुक्त ठरू शकते. डोमेन नेम बुक करताना सखोल शोध घ्यावा. कारण समान व्यवसाय अथवा कॉमन वापरात असलेली काही डोमेन नेम ही लिलाव पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचाही पर्याय निवडता येईल. कुणाचीही कॉपी नको

आपल्या स्पर्धक कंपन्यांशी स्पर्धा करताना त्यांच्या नावाप्रमाणेच वेबसाइटचे नाव देण्याचा कल असतो. पण त्याऐवजी जर आपल्या कंपनीची स्वत:ची ओळख व ते नाव स्वत: एक सशक्त ब्रँड होईल, या दृष्टीने नावाची निवड करावी. स्पर्धक कंपनीच्या नावाशी स्पर्धा करण्याचा तोटाच अनेक वेळा होतो. एकतर त्या कंपनीचे जे रेप्युटेशन आहे, त्याच्याशी तुम्हीही अकारण जोडले जाता. व दुसरे म्हणजे, एखाद्याने सर्च दिलाच, तर सर्च देणारी व्यक्ती तुमच्या वेबसाइटऐवजी स्पर्धक कंपनीच्या वेबसाइटवर जाण्याची शक्यता असते.




source:- http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=122