इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Showing posts with label असा मिळवा ‘आर्कुट’वरील डाटा. Show all posts
Showing posts with label असा मिळवा ‘आर्कुट’वरील डाटा. Show all posts

Monday 14 July 2014

असा मिळवा ‘आर्कुट’वरील डाटा

ऑर्कुट बंद होणार ही बातमी गेल्या आठवड्यात सर्वांपर्यंत पोहोचली. त्यानंतर अनेकांनी पुन्हा एकदा ऑर्कुटला भेट देऊन जुने दिवस आठवले. पण तुमचे जुने सगळे फोटो, पोस्ट पुन्हा मिळणार नाहीत अशी भीती बाळगू नका. त्यावरील डाटा ट्रान्सफर झालेला नाही. हा डाटा तुम्हांला हवा असेल तर तो सहजपणे मिळू शकतो. गुगलने तुम्हांला ती संधी दिली आहे. मात्र, दुसऱ्याला पाठविलेले स्क्रॅप्स किंवा टेस्टिमोनियल्स तुम्हांला डाउनलोड करता येणार नाही. परंतु, तुम्ही दुसऱ्या युजर्सने पाठविलेला डाटा, स्क्रॅप्स किंवा टेस्टिमोनीयल डाउनलोड करता येणे शक्य आहे.


ट्विटर, फेसबुक यांच्यापूर्वी आर्कुट हे एकमेव सोशल मीडियाला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, फेसबुकची इतर सोशल मीडियाची लोकप्रियता वाढल्यानंतर आर्कुटचे महत्त्व कमी कमी झाले. परंतु, अजूनही अनेक यूजर्सचे आर्कुटवर अकाउंट आहेत. आर्कुटवरील पिक्चर्स तुम्ही सहजपणे सेव्ह करू शकता. यासाठी आर्कुटवरील तुमचा डाटा गुगल प्लसवर ट्रान्सफर करू शकता. ही सुविधा तुम्हांला २० सप्टेंबर २०१४ पर्यंत उपलब्ध आहे. डाटा ट्रान्सफर करण्यासाठी पुढील टिप्सचा अवलंब करू शकता.

सर्वप्रथम गुगल प्लसवर जाऊन तुमचे अकाउंट ओपन करा. यानंतर आर्कुट अल्बम एक्स्पोर्ट पेज ओपन करा. तुम्हांला जो अल्बम किंवा डाटा हवा असेल त्यावर क्लिक करा. सर्वच डाटा हवा असेल तर त्यावर क्लिक करा. यानंतर इम्पोर्ट सिलेक्ट केल्यास तुमचा सर्व डाटा, फोटोज गुगल प्लसवर ट्रान्सफर होईल. गुगल प्लसवर हे फोटो फक्त तुम्हाला दिसतील. इतरांनाही हे फोटो पाहता यावेत यासाठी प्रायव्हसी सेटिंगमध्ये बदल करणे गरजेचे आहे. तुम्हांला हे पिक्चर्स व स्क्रॅप्स सेव्ह करायचे आहेत तर गुगल टेकआऊटचा वापर करू शकता. या गुगल टेकआऊटव्दारे तुम्हांला सर्व डाटा झिप फाइलमध्ये डाउनलोड करता येईल. फाइल आणि फोटो HTML फाइल स्वरूपात तयार होतील.

आर्कुटवरील तुमचे प्रोफाइल, रिसिव्ह स्क्रॅप्स, टेस्टिमोनीयल्स, फोटोज तुम्ही डाउनलाड करू शकता. यासाठी गुगल टेकआउटचा वापर करू शकता. याव्दारे सप्टेंबर २०१६ पर्यंत आर्कुटवरचा डाटा तुम्ही डाउनलोड करू शकता. यासाठी गुगल टेकआउटवर साइन करून choose service वर क्लिक करा. यानंतर आर्कुटला सिलेक्ट करा आणि क्रिएट अर्काइव्हवर क्लिक करा. अर्काइव्ह रेडी होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे. जास्त वेळ लागत असेल तर तुम्ही पेजवरून बाहेर पडू शकता. अर्काइव्ह रेडी झाल्याचा तुम्हांला ई-मेल येईल. एकदा अर्काइव्ह रेडी झाले तर डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही डाटा मिळवू शकता. मात्र, यासाठी गुगलने मर्यादा ठरवली आहे.