इंटरनेट वर पैसे कसे कमवायचे?

Tuesday, 15 July 2014

ईमेलच्या खाली सही करा.

ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार. तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते.

ब्लॉगवरील प्रत्येक पोस्टच्या खाली आपली मस्त वळणदार सही असल्यास कशी दिसेल? अर्थातच चांगलीच दिसणार. तुम्हालासुद्धा तुमची सही ब्लॉगपोस्टच्या खाली करता येऊ शकते.

Online Wisestamp Click



मराठी टायपिंग मोबाईल






Android मोबाइल वर मराठी-हिन्दी मध्ये लिहिण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गूगल हिंदी इनपूट नावाचं अॅप्लिकेशन जे तुम्ही मराठी शब्दाच इंग्लिश टायपिंगसुद्धा मराठीत लिहीतं......
जसे की ह्यामध्ये जर तुम्ही shahal अस लिहिलं तर तुम्हाला शहाळ असं दिसेल अथवा टाइप होईल
वापरुन पहा ..... नक्की आवडेल
मोफत डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंकवर जा गूगल हिंदी अॅप्स





मराठी टायपिंग कॉम्पुटर

 मराठीतून टायपिंग करायचंय ? हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठीतून टायपिंग. थोड्या       वर्षांपूर्वी मराठीतून टायपिंग कराण्यासाठी सर्व अक्षरं पाठ करून त्यासाठी इंग्लिश बटणे लक्षात ठेवावी लागत.मात्र आता खाली दिलेल्या पर्यायांना वापरुन तुम्ही मराठी टायपिंग एकदम सोप्या पद्धतीने करता येते. ही सर्व सोंफ्टवेअर यूनिकोड प्रकारची आहेत.



                              


            यामुळे तुम्ही मराठी शब्दाचे इंग्लिश स्पेलिंग लिहून मराठी शब्द  टाइप करता येऊ शकते.

उदा.    Marathi     -     मराठी
           Microsoft  -    मायक्रोसॉफ्ट
           Blog          -     ब्लॉग

  गूगल                      1. http://www.google.com/intl/mr/inputtools/try/

 मायक्रोसॉफ्ट          2. http://www.bhashaindia.com/ilit/

 Quillipad               3.  http://quillpad.in/marathi/ 


 बरहा                      4.  www.baraha.com


source:-http://www.marathitech.in/2012/09/marathi-typing.html

Monday, 14 July 2014

गुगलमध्ये माहिती शोधताना

गुगल.कॉमवर आपण बर्‍याचवेळा निरनिराळ्याप्रकारची माहिती शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी गुगल.कॉमवर अनेक (हजारो) वेबसाईटची यादी समोर येते. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठिण जाते आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय नसतो. मग विनाकारण खुप वेळ वाया जातो. अशावेळी गुगलचा कंटाळा येतो.
कधीकधी गुगल.कॉमचा हाच स्वभाव अनेकांना आवडत नाही. विचारलेल्या माहितीची असंख्य पाने दाखविल्यावर त्यांना राग येतो. यावेळी गुगल.कॉमला नावे ठेवण्यापेक्षा आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल.कॉमला मदत होते आणि परीणामी आपला वेळही वाचतो.
गुगल.कॉमवर माहिती शोधताना कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो.



१. आपल्या प्रश्नामध्ये ' + '  चिन्हाचा वापर करावा :  समजा गुगल.कॉमवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (म्हणजेच मोबाईलचा इतिहास) शोधायचे असल्यास गुगल.कॉम ' Mobile + History ' असे सर्च केल्यास गुगल.कॉम हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.
२. आपल्या प्रश्नामध्ये ' - '  चिन्हाचा वापर करावा :  समजा जर आपणास गुगल.कॉमवर  'sachin'  असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये 'sachin tendukar' च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगल.कॉमला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर 'sachin -tendukar' असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल.कॉम येणार्‍या उत्तरामध्ये 'tendukar'' हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.
३. आपल्या प्रश्नामध्ये ' ~ '  चिन्हाचा वापर करावा :  गुगल.कॉमवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखिल गुगल.कॉम दाखवितो.
४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास :  सध्या बर्‍याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीह एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगल.कॉमवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल.कॉम फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो. उदा. ' site:www.abc.com mobile ' असे दिल्यास गुगल.कॉम फक्त www.abc.com  वर mobile  हा शब्द शोधेल.
५. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचे असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगल.कॉम त्या शब्दाच्या आधी ' define: ' असे दिल्यास गुगल.कॉम त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ' define:Computer ' असे शोधल्यास गुगल.कॉम ' Computer ' या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.
६. मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्‍याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमूळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्या विषयीच्या आणि त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का? ते शोधण्यासाठी ' related: ' या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ' related:http://www.xyz.com/ ' असे शोधल्यास गुगल.कॉम ' www.xyz.com ' प्रमाणेच माहिती असणार्‍या वेबसाईटची यादी देईल.
७. जसाच्यातसा शब्ध शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगल.कॉमवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच " " याचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर "contact us"  असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एखत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.
८. आपल्या प्रश्नामध्ये ' * '  चिन्हाचा वापर करावा :  गुगल.कॉमवर एखादा शब्द शोधताना तो शब्द  पुर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधीत इतरही शब्द सापडल्यास ती देखिल दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ' * '  चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगल.कॉमवर ' friend* '  असे शोधल्यास friend  ह्या शब्दासोबत friends , friendship  या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचा देखिल उत्तरामध्ये विचार करतो.
९. आपल्या प्रश्नामध्ये ' ? '  चिन्हाचा वापर करावा :  एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ' ? '  चिन्हाचा वापर करावा. उदा. ' fri??d '  असे सर्च केल्यास गुगल.कॉम त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्यती अक्षरे घेवून त्या माहितीची पाने दाखवितो.
१०. आपल्या प्रश्नामध्ये ' AND  अथवा OR '  शब्दाचा वापर करावा : एखाद्या वेळेस जर आपणास दोन शब्दाना मिळून एकत्रिच सर्च करायचे असते त्या वेळी ' AND  अथवा OR '  शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल.कॉम मध्ये सर्च करताना ' Mobile or Books ' सर्च केल्यास गुगल.कॉम ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ' AND '  शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.


source :- http://www.sahajach.com/mala_bharpoor_yete/google_search.html

प्रॉब्लेम्स शेअर करणारी वेबसाइट

'शेअरिंग दर्द डॉट कॉम' वेबसाइट सुरू
९० हजारांहून अधिक युजर्स 

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद 

अभ्यासाचं टेन्शन असो वा मित्र-मैत्रिणींची भांडणं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, ब्रेकअप, बॉसची कटकट, कामाचा ताण अशा अनेक प्रॉब्लेम्सना आपण दररोज सामोरे जातो. मात्र, याबाबत आपण कोणाशीही बोलत नसल्याने मनाची घुसमट होते. त्यामुळे युवक व युवतींच्या अशा अनेक समस्यांवर सोल्युशन म्हणून चार तरुणांनी 'शेअरिंग दर्द डॉट कॉम' ही वेबसाइट तयार केली आहे. तिच्या माध्यमातून सध्या ९० हजारांहून अधिकजण आपले प्रॉब्लेम्स शेअर करत आहेत. त्यांना जॉब व लव्ह अँड रिलेशनशिप दर्दचे प्रॉब्लेम आहेत. 




या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट शेअर करू शकता. तुम्हाला येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी इथले मित्र तुम्हाला मदत करतात आणि तेही मोफत. कारण तेही तुमच्यासारखेच समदु:खी असतात. विशेष म्हणजे इथे तुमची ओळख गुप्त ठेवली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनही मोफत मिळते. अर्थात सल्ला मोफत मिळतो, मानसोपचार हवे असल्यास मात्र डॉक्टरांची फी द्यावी लागते. आयआयएम लखनौमधून शिक्षण घेतलेल्या रितिका शर्मा, सुमंत गजभिये, गौरव राजन आणि लिमा जेम्स या चार मित्रांनी या वेबसाइटची निर्मिती केली आहे. सध्या हे चौघेही मुंबईतच असतात. दोन वर्षांच्या प्रयत्नातून त्यांनी ही वेबसाइट आठ महिन्यांपूर्वी तयार केली आहे. 

या वेबसाइटवर १६ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम समुपदेशनाचे काम करते. मुंबईमधील तरुणांना आय एम फिलिंग लोनली दर्द हा प्रॉब्लेम अधिक आहे, तर कोल्हापुरातील तरुणांना जॉब व लव अँड रिलेशनशिप दर्द आहे. या वेबसाइटवर सहा प्रकारची विभागणी केली असून जॉब अँड करिअर दर्द, आय एम फिलिंग लोनली दर्द, लव अँड रिलेशनशिप दर्द, सोशल अँड फॅमिली दर्द, मेट्रोमोनी सर्च दर्द, सोशल तेबू दर्द असे आहेत. 

एकटेपणा, डिप्रेशन, घुसमट हे सारे बोलण्यासाठी हक्काची जागा हवी असे त्यांना वाटायचे. त्यातूनच तयार केली एक वेबसाइट 'शेअरिंग दर्द डॉट कॉम'. यामुळे अनेकांना आपले मन मोकळे तर करता येतेच, शिवाय टेन्शन फ्री जीवन जगण्याची नवीन दिशा मिळत आहे. - सुमंत गजभिये, वेबसाइट डेव्हलपर 





source :- http://maharashtratimes.indiatimes.com/infotech/computer/sharingdard-to-share-some-problem/articleshow/28678112.cms